यावल: यावल तहसील कार्यालयात सेवा पंधरवडा निमित्ताने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनासोबत बैठक संपन्न,विविध कार्यक्रमाचे नियोजन
Yawal, Jalgaon | Sep 15, 2025 यावल येथील तहसील कार्यालय तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, भाजप मंडळाध्यक्ष सागर कोळी, उमेश बेंडाळे व अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने सदर उपक्रम कशा पद्धतीने यशस्वी केले जातील याबाबत चर्चा करण्यात आली व नियोजनाची माहिती जाणून घेण्यात आली.