नागपूर शहर: नागपुरात कडाक्याच्या उन्हामुळे धावत्या मारुती व्हॅनला आग
शहरात उष्णतेचा पारा वाढल्याने आता वाहनेही पेट घेऊ लागली आहेत. 17 एप्रिल ला दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी महाल परिसरातील झेंडा चौक येथे भीषण उष्णतेमुळे एका मारुती व्हॅनला अचानक आग लागली.महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाढत्या उन्हामुळे वाहनधारकांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे. या घटनेमुळे काही वेळासाठी पूर्णतः ट्राफिक जाम झा