घनसावंगी: जालन्यात झोपेत असताना एकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून…रुई येथील घटना
आज दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात झोपेत असताना एका व्यक्तीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील रुई येथे ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जालना जिल्हा हादरला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिलीप धुराजी राजगुरू (वय अंदाजे 45 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. उष्णतेमुळे दिलीप राजगुरू हे आपल्या घराच्या गच्चीवर झोपलेले होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या गळ्