नागपूर शहर: मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त; दोघांना अटक : ललिता तोडासे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी 13 जूनला दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार गिट्टीखदान पोलिसांनी कारवाई करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. अब्बास उर्फ आबू आणि रितिक उर्फ वाट्या या दोघांकडून ३ देशी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, तलवारी, चाकू आणि एक टोयोटा फॉर्च्युनर कार असा एकूण २० लाख ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी दिली आहे.