पंचायत समिती अंजनगाव सुर्जी अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.आज सकाळी ११ वा.या महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळवंत वानखडे तर उद्घाटक म्हणून आमदार गजानन लवटे उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणून IAS संगीता मोहपत्रा तसेच कल्पना जायभाये गटविकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुर्जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.