महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.