बजाज नगर येथील पॉश वस्तीतून चंदनाच्या झाडाची चोरी करण्यात आली आहे. बजाज नगर परिसरातील श्रीराम मंदिरासमोर 40 वर्षापासून एक चंदनाचे झाड होते. पहाटेच्या सुमारास पाच ते सहा लोक मालवाहक टेम्पो घेऊन तेथे पोहोचते त्यांनी इलेक्ट्रिक कटाच्या सहाय्याने झाड तोडले व ते टेम्पोत टाकून फरार झाले. झाड तोडत असताना तेथील विजेच्या तारा देखील पडल्या या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.