नागपूर शहर: १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपीला अटक: हरेश काळसेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 29 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार मानकापूर परिसरात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १६ आठवड्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार वैद्यकीय तपासणीत समोर आला आहे. शारीरिक त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता हा खुलासा झाला. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे