समुद्रपूर: जाम चौरस्त्यावरील पेट्रोलपंपावर ट्रकच्या मागच्या चाकात दबून क्लिनरचा जागीच मृत्यू : समुद्रपुर पोलिसात नोंद
समुद्रपुर तालुक्यातील जाम चौरस्त्यावरील पेट्रोलपंपावर बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास डिझल भरण्यासाठी उभा असलेल्या ट्रक क्रमांक UP 70 DT- 8495 च्या क्लिनर शिववंदन वर्मा वय २२ याचा ट्रकच्या मागच्या चाकातील गिट्टी काढत असताना दबून जागीच मृत्यू झाला असून यासंबंधी आज ९ मेला समुद्रपुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढिल तपास प्रभारी ठाणेदार संदिप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.