समुद्रपूर: तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान महागाव येथे विज पडून बैल ठार: शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपुर: तालुक्यात अचानक मेघगर्जनेसह विजेच्या कळकळासह झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले असून गुरुवारी ९ मेला १२ वाजताच्या सुमारास महागाव येथील शेतकरी गजानन भोमले यांच्या गावा शेजारी असलेल्या गोठ्याच्या समोर बांधून असलेल्या बैलावर विज पडून बैल जागीच ठार झाला यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतामध्ये साठवून असलेली जनावरांची वैरण ओली झाली.अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने विज पुरवठा खंडित झाला.