समुद्रपूर: वाकसुर घाटावर महसूल विभागाच्या पथकाला धमकी देऊन ट्रॅक्टर घेऊन पसार झालेल्या चालक व मालकाला पोलिसांनी केली अटक
समुद्रपुर:महसूल विभागाच्या पथकाने तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात वणा नदीच्या वाकसुर वाळू घाटावर अवैध वाळू वाहतक करणारा ट्रॅक्टर चालक महसूल विभागाच्या पथकाला सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धमकी देऊन अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर घेऊन पसार झालेल्या ट्रॅक्टर मालक युवराज कारमोरे व चालक प्रकाश पाटील राहणार कानकाटी या दोघांना पोलिसांनी आज ८ मेला ३ वाजता अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.