समुद्रपूर: खापरी येथिल हनुमान मंदिरात घेण्यात आली विष मुक्त आहार अभियानांतर्गत किसान चावळी बैठक
समुद्रपुर तालुक्यातील खापरी येथिल हनुमान मंदिरात आज बुधवारी ८ मेला सायंकाळी ७.३० वाजता गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने विषमुक्त आहार अभियानांतर्गत शेतकरी चावळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे,जैविक शेती अभ्यासक चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे सुरेश सेलोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीडनाशकांचा अती वापर मनुष्यांच्या आरोग्यासाठी किती घातक आहे याची सविस्तर माहिती दिली.