खालापूर: निपुण महाराष्ट्र मध्ये रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती
राष्ट्रीय शिक्षण धोरण सन 2020 नुसार प्राथमिक स्थरावर सन 2026-27 पर्यंत पायाभूत व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याकरीता शासनामार्फत 'निपुण महाराष्ट्र' अभियान राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्याच्या पडताळणीकरीता मासिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.