नागपूर शहर: भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन
महान समाजसुधारक, क्रांतीकारक आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.