नागपूर शहर: गणेशपेठ बस स्थानकाजवळ आढळलेल्या अज्ञात महिलेचा मृत्यू
20 मे ला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील NMC बस थांब्यावर एक ४५ ते ५० वर्षे वयाची अज्ञात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.या प्रकरणी पोलीस हवालदार आतिष सोमेश्वर निकोडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नो