नागपूर शहर: नागपुरात अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल: गजानन तामटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 29 मे ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर परिसरात १० ते १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची आणि त्यानंतर मुलींच्या वडिलांना धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी दिली आहे