नागपूर शहर: कुलरच्या पाण्यावरून वाद, म्हाडा क्वार्टरमध्ये चाकू हल्ला; दोन जण गंभीर: सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ
कपिल नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघे यांनी चार मे ला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुबोध नगर (म्हाडा क्वार्टर) येथे कुलरचे पाणी साचल्याच्या शुल्लक कारणावरून दोन कुटुंबात थरार पाहायला मिळाला.पहाटे झालेल्या या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होऊन चाकू हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिली आहे.