भाजपमध्ये तुमसर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून झालेली बंडखोरी शमवण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आणि भाजप आमदार परिणय फुके यांनी ज्येष्ठ भाजप नेते तथा माजी खासदार 3 वेळचे माजी आमदार मधुकर कुकडे यांची तुमसर येथील निवासस्थानी भेट घेतली. नगराध्यक्षपदासाठी भाजपने प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार मधुकर कुकडे यांचे पुतणे आशिष कुकडे यांनी बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फुके यांनी मधुकर कुकडे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली.