जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले तृतीयपंथी शमिभा पाटील यांच्या विरोधातील आमरण उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आले आहे. निसर्ग तृतीयपंथी फाऊंडेशनच्या सदस्यांनी सुरू केलेले हे आंदोलन अखेर लहुजी शक्ती संघटनेच्या मध्यस्थीमुळे आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता स्थगित झाले. दरम्यान दोन्ही गटांमध्ये आता भविष्यात कुठलाही वाद होणार नाही असे आश्वासन यावेळी रमेश कांबळे यांनी दिल आहे