नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; आरोपी गजाआड: शुभम बकाल पोलीस उपनिरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बकाल यांनी 24 एप्रिल ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयुष रमेशचंद्र अग्रवाल याला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर इंस्टाग्रामद्वारे दोन समुदायांत तेढ निर्माण केल्याचाही ठपका आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे. त्याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक शुभम ब