नागपूर शहर: कळमना येथील मसाल्याच्या गोदामात चोरी; लाखोंची रोकड लंपास
29 एप्रिलला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कळमणा पोलीस ठाणे हद्दीतील मसाल्याच्या गोदामाची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. नंदलाल लाहोटी यांच्या गोदामात २५ ते २७ एप्रिल दरम्यान ही चोरी झाली. या प्रकरणी प्राप्त तक्रारी करून कळमणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेत आहेत.पुढील तपास पोलीस करीत आहे.