मानवत: मानवत तालुक्यातील कोल्हा येथे शटर वाकवून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शटर वाकवुन अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टीम,चॅनल गेट, शटर वाकवुन 60 हजारांचे नुकसान करत बँकेतून 44 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बँकेचे शाखा मॅनेजर श्रीकांत नाईक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात मानवत पोलीस ठाण्यात सोमवार 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता गुन्हा दाखल.