नागपूर शहर: नागपुरात अवैध ई-सिगारेट विक्रीचा पर्दाफाश; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
24 एप्रिल ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने पाचपावली परिसरात धाड टाकून अवैध ई-सिगारेट विक्री करणाऱ्या वैभव विकास कांबळे याला अटक केली आहे. आरोपीच्या घरातून विविध फ्लेवर्सच्या ११२ ई-सिगारेट्स, एक मोपेड आणि मोबाईल असा एकूण ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर ई-सिगारेट प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकु