नागपूर शहर: नागपुरात रेल्वे अपघातात दोन अनोळखी तरुणांचा मृत्यू
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळावर दोन अनोळखी पुरुषांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ९ मे रोजी रात्री ९:३५ च्या सुमारास उघडकीस आली.मृतांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे आहे. रेल्वेच्या धडकेमुळे मृतदेहांची अवस्था अत्यंत छिन्नविच्छिन्न झाली होती. फिर्यादी जगदीश कामडी (ट्रॅकमन) यांनी दिलेल्या माहितीवरून सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स हॉस्पिटल, मिहान येथे पाठवले आहेत.