Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: देऊळगाव माळी येथून जवळच असलेल्या एकांबा शिवारात बिबट्याचे दर्शन, नील गाईची केली शिकार परिसरात भीतीचे वातावरण

Mehkar, Buldhana | Feb 19, 2026
वातावरणमेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी व मोहदरी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या एक आंबा, कुंभारी शिवारात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान हर्षल लोढे मोहदरी येथील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तसेच बिबट्याने मोहरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हर्षल लोढे यांच्या कुंभारी शिवारात रोही या वन्य प्राण्याचा सुद्धा फाडसा पाडला आहे. हर्षल लोढे यांना बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी लगेचच परिसरातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना कळविले. त्यानंतर शेतकरी परिसरात धावून आल्यानंतर त्यांना बिबट्याने नील गाईची शिकार केली हे लक्षात आले असून, 50 ते 60 शेतकरी सध्या बिबट्याच्या शोधात आहे. त्याचबरोबर या शिवारात चीया, मक्का, गहू, खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला दडून बसण्यासाठी जागा सुद्धा आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे सुद्धा बंद ठेवली असून, एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.
मेहकर: देऊळगाव माळी येथून जवळच असलेल्या एकांबा शिवारात बिबट्याचे दर्शन, नील गाईची केली शिकार परिसरात भीतीचे वातावरण - Mehkar News