नागपूर शहर: “युद्ध शस्त्रांनी नाही, तर ‘शास्त्रा’ने जिंकता येते”; नागपुरात आचार्य प्रशांत यांचे जोरदार आवाहन
प्रसिद्ध तत्त्वचिंतक आणि वेदांत मर्मज्ञ आचार्य प्रशांत यांचे आज उपराजधानीत आगमन झाले. नागपूर विमानतळावर त्यांच्या चाहत्यांनी आणि अनुयायांनी त्यांचे अत्यंत भव्य आणि उत्साही स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जागतिक संघर्षापासून ते भारतीय संस्कृतीच्या सामर्थ्यापर्यंत अनेक विषयांवर आपली रोखठोक मते मांडली.