नाशिकरोड उपनगर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त महिलेची २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कम काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीमती प्रमिला रमेश मैना (वय ६५, रा. कमला पार्क, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी कृष्णा, राजेश व सागर चंडालिया (रा. आडके नगर, नाशिकरोड) यांनी ३० जून २०२० ते ३१ मे २०२२ या कालावधीत फिर्यादीचा विश्वास संपादन करून विविध खात्यातून 30 लाख रुपये काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.