रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 37 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पार पडले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, न्यायाधीश विजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.