जालना: ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान - मेरा स्वस्थ, मेरा गर्व’ अंतर्गत आरोग्य शिबिर; युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
Jalna, Jalna | Sep 27, 2026 ‘नशेला नकार, आरोग्याला स्वीकार’ हा संदेश देत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत मेरा युवा भारत, जालना, युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान - मेरा स्वस्थ, मेरा गर्व’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परिचर्या प्रशिक्षण केंद्र, शासकीय रुग्णालय, जालना येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.