नागपूर शहर: नागपुरात २५ लाख वृक्षारोपणाचा संकल्प: 'एक पेड माँ के नाम' उपक्रमावर भर
केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या विकासकामांची माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरला 'हरित शहर' बनवण्यासाठी २५ लाख वृक्षारोपणाचा संकल्प जाहीर केला आहे. 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत शाळा, विद्यापीठे आणि विविध संस्थांच्या सहभागातून २ ते ३ मीटर उंचीची झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे