लातूर: लातूरच्या सिद्धेश्वर चौकापुढील बरकत नगर रोड जोरदार पावसामुळे झाला जलमय; नागरिकांना वाहनचालवने झाले कठीण
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर : लातूर शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नाल्या तुंबून रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरासमोरील बरकत नगर रोडवर अशीच परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाचे पाणी नाल्यांतून ओसंडून थेट रस्त्यावर आले. परिणामी संपूर्ण रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्ता दिसेनासा झाला.