औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथील योगेश सांगळे यांनी भारतीय अंतराळ संस्थेची परीक्षा उत्तीर्ण होत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा औंढा नागनाथ तालुक्यातील पहिला वैज्ञानिक होण्याचा मान मिळवला. गोजेगाव येथील सोपान सांगळे यांचा मुलगा योगेश सांगळे याने गगन भरारी घेत थेट भारतीय अंतराळ संस्थेची निवड परीक्षा पास होऊन वैज्ञानिक इंजिनीयर पदापर्यंत मजल मारली. योगेशचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण हिंगोली येथे पूर्ण झाले,