लातूर: हवामान विभागाचा इशारा — पुढील ३ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!
Latur, Latur | Oct 5, 2025 महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) ने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील ३ तासांमध्ये राज्यातील जळगाव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील काही भागात मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा इशारा 05 ऑक्टोबर रात्री 10:00 वाजता जारी करण्यात आला असून, याची वैधता 06 ऑक्टोबर पहाटे 1:00 वाजेपर्यंत राहणार आहे.