हातकणंगले: आळते हायस्कूलसमोर गतिरोधक लावण्याची तातडीची मागणी
हातकणंगले-वडगाव महामार्गावरील आळते येथील बाळासाहेब पाटील हायस्कूलसमोर वाहनांच्या वेगामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे गतिरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग लावण्याची पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने मागणी केली आहे.