हिंगणघाट: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारचे धोत्रा येथे चक्काजाम आंदोलन: पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
हिंगणघाट वर्धा मार्गावर धोत्रा चौरस्तावर प्रहार जनशक्ती प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी जवळील १५,२० मिनींट प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्धा हिंगणघाट मार्ग रोखून धरला.घटनास्थळी अल्लिपुर पोलिसांनी दाखल होऊन आंदोलनलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची सुटका केली.या आंदोलनात मोठ्या संख्येने प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.