हिंगणघाट: विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्या:राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
हिंगणघाट: महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री श्री. माणिकराव कोकाटे वांचा तात्काळ राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादिचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे याच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवेदन दिले आहे.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे राज्यातील शेतकऱ्यांचा भावना दुखावतील या हेतूने वारंवार वक्तव्य करीत आहे.