बोदवड: उमरा येथील वृद्धचा वायला बसस्टॅन्ड मागे नील गाईंच्या कळपाने धडक दिल्याने मृत्यू,मुक्ताईनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Oct 15, 2025 उमरा या गावातील रहिवाशी बाबुराव धर्मा पवार वय ७१ हे वृद्ध इसब वायला बस स्थानकाच्या मागे कच्चा रोडावर आपली दुचाकी लावून शेतात जात होते. दरम्यान तेथे नील गाईंच्या कळपाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचाराकरिता मुक्ताईनगर रुग्णालयात नेण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.