अचलपूर: पो.स्टे.हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार;पीडिता गर्भवती,नवजात जुळ्या बालकांचा मृत्यू
परतवाडा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना दिनांक २३ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे.या प्रकरणात पीडिता गर्भवती राहिल्याने आणि प्रसूतीदरम्यान दोन्ही नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते २२ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान आरोपी राहुल लक्ष्मण पिसे (वय १९, रा. कुटीर रुग्णालय मागील झोपडपट्टी, परतवाडा) याने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. या अत्याचारामुळे ती गर्भवती झाली.