नागपूर शहर: 'मस्त मनी' लोन ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक; मास्टरमाइंड कामिल सिद्दीकी गजाआड : दीपक अग्रवाल पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी 8 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,मस्त मनी' या बनावट लोन ॲपच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड कामिल सिद्दीकी याला सायबर पोलिसांनी भोपाळमधून अटक केली.आरोपी हे ॲप आरबीआय नोंदणीकृत असल्याचे सांगून लोकांकडून पॅन कार्ड आणि फोटो मिळवत असत. त्यानंतर फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडिओची धमकी देत खंडणी वसूल केली जात असे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून तो उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.