नागपूर शहर: पारडी पोलिसांची कारवाई: एमडी ड्रग्जसह दोघांना अटक : नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 16 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पारडी पोलिसांनी पुनापूर भवानी नगर परिसरात सापळा रचून दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. साबिर अंसारी आणि अनिल वासनिक अशी आरोपींची नावे आहेत.आरोपीकडून एकूण २ लाख ९० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पारडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदामनगटे यांनी दिली आहे.