मानगाव: मुंबई-गोवा महामार्गाला अडथळ्यांची अखंड शर्यत
Mangaon, Raigad | Apr 27, 2026 मुंबई-गोवा महामार्ग कोकणच्या विकासाचा कणा आहे. मात्र आजही हा मार्ग अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेला दिसतो. 2011 साली मंजुरी मिळालेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या पंधरा वर्षात अडचणी, प्रशासकीय विलंब आणि नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी एक वेदनादायी अनुभव ठरत आहे. महामार्गाचे हे काम कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.