अमरावती शहरातील फ्रेझरपूरा परिसरात एका महिलेची बॅग हिसकावून दोन अज्ञात इसम पळून गेल्याची घटना घडली 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली असून या चोरीत अंदाजे ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला सायंकाळी सामान खरेदी करून घरी परतत होती. त्याचवेळी दोन अज्ञात इसमांनी तिचा पाठलाग करून अचानक बॅग हिसकावली आणि मोटारसायकलवरून पसार झाले.महिलेने तत्काळ फ्रेझरपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. बॅगमध्ये रोकड रक्कम व इतर महत्त्वाचे कागदपत्रे होती