जालना: जालना येथील टोल नाक्यावर प्रतिबंधित गुटखा जप्त; तरुणासह 1 लाख 44 हजाराचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
Jalna, Jalna | Mar 28, 2026 जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेवाडी टोलनाक्यावर कारवाई करत पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 1 लाख 44 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन यांनी फिर्याद दिली आहे. दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7.40 वाजता पोलीस पथक चंदनझिरा हद्दीत पेट्रोलिंग करत होते.