देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथील ऐतिहासिक
परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या कार्तिक उत्सवास मंडप उभारणी करून प्रारंभ
*श्री बालाजी महाराजांच्या कार्तिक उत्सवास प्रारंभ* देऊळगाव राजा प्रतीतिरूपती म्हणून ख्याती असलेल्या देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराजांचा कार्तिक उत्सव प्रसन्न व मंगलमय वातावरणात सुरू झाला आहे. शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोंबर रोजी पाच वाजता श्री बालाजी मंदिरासमोर मानकरी व भाविक भक्तांनी मंडपाच्या आच्छादन केले व कार्तिक मंडपोत्सवाससुरुवात झाली .यावेळी वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधवराणीसाहेब मानकरी व भक्तगण यांची उपस्थिती होती