भंडारा येथील नेहरू वॉर्ड ढिवर मोहल्ला येथील रहिवासी मंजू हेमराज मोरकुटे (वय ३१) यांचा डोंगरला ते तुमसर मार्गावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ०२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डोंगरला पुलाजवळ घडली. मृतकाचे पती त्यांच्या मो. सा. वरून मुलगी व पत्नीला घेऊन एम.पी. वरून डोंगरला-तुमसर मार्गे भंडाराकडे जात असताना, डोंगरला पुलाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी उसळली. यामुळे मंजू मोरकुटे मोटार सायकलवरून रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.