नागपूर शहर: जुन्या वादातून टीपु तरुणाची चाकू भोसकून हत्या; मुख्य आरोपीसह अल्पवयीन ताब्यात: युनूस शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी 10 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूर: यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टीपू सुलतान चौकात जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सलमान अन्सारी असे मृत तरुणाचे नाव आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिली आहे