औंढा नागनाथ: महसूल सेवांना सज्जा कार्यालयास वर्ग करावे, महसूल सेवकांची औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी
महसूल सेवक यांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास सलग्नित न करता त्यांना त्या त्या सज्जा कार्यालयास वर्ग करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना तालुका औंढा नागनाथ च्या वतीने दिनांक १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्याकडे निवेदन देत केली आहे. महसूल सेवक संवर्गातील कर्मचारी यांची नियुक्ती मूळ पदस्थापना तलाठी सज्जा ठिकाणी करण्यात आलेली असून सुद्धा बरेच सेवक वरिष्ठ कार्यालयासी सलग्नित आहेत