नागपूर शहर: दारू पार्टीमध्ये वाद आणि नंतर चालले चाकू, अंबाझरी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात: सुरेश मांटे, पोलीस निरीक्षक
३० जूनला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू पार्टीमध्ये वाद झाला आणि त्यानंतर चाकू बाजी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे