हवेली: वाघोली येथे मल्याळी असोसिएशन इस्ट पुणे यांच्या वतीने 'पॉन्नोनम २०२५' चे आयोजन
Haveli, Pune | Sep 17, 2025 'पॉन्नोनम २०२५' चे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते.मल्याळी असोशिएशन इस्ट पुणे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केरळची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि स्नेह यांचा संगम यावेळी पहायला मिळाला. रंगीत रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषा आणि केरळच्या लोककलेचे सादरीकरण मल्याळी बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.