हिंगोली: राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक
हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटातर्फे दिनांक १८ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी राष्ट्रवादी भवन येथे दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी कार्यक्रम, जनसंपर्क मोहिमा व स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर, एडवोकेट शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस मा. परमेश्वर इंगोले त्यांच्यासोबतच पक्षाचे विविध पदाधिकारी, शहर व तालुकास्तरीय